
बावडा कोविड केअर सेंटरमध्ये योग दिन साजरा
रुग्णांना दिले योगाचे धडे
इंदापूर: प्रतिनिधी
बावडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये आज सोमवारी (दि.२१) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. हिना काझी यांनी रुग्णांना योगाचे धडे दिले. आरोग्य म्हणजे काय? योगा म्हणजे काय? त्याचे फायदे काय ? शरीर, बुध्दी आणि मन यांचे एकत्रिकरण म्हणजे योगा हे सागून त्यांनी आसनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच योगामुळे शरीराची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकून राहते. त्यामुळे प्रत्येकाने नियमितपणे योगासने केली पाहिजेत. शरीरातील ऑक्सिजन पातळी टिकून राहण्यासाठी कोणते योगासन करावे, याचेही त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.
या कार्यक्रमात परिचारिका प्रिय॔का साठे, सोहेल सय्यद यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.कपिलकुमार वाघमारे, डाॅ.विनोद घोगरे आदींनी केले.