बावडा दूरक्षेत्र हद्दीतील अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई
आरोपींवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल
बावडा दूरक्षेत्र हद्दीतील अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई
आरोपींवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
बावडा दूरक्षेत्र हद्दीतील रेडणी,नीरा नरसिंहपूर, गिरवी, गणेशवाडी या भागातील देशी-विदेशी,गावठी हातभट्टी दारुची अवैद्य विक्री करणा-या ठिकाणांवर पोलीसांनी छापे मारुन सात जणांवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करत १५ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सुभाष वामन चव्हाण,नागेश संजय चव्हाण,अजय संभाजी चव्हाण,जयवंत नामदेव हाके (सर्व रा.रेडणी), सयाजी महादेव घोगरे(रा.गणेशवाडी),तानाजी जनार्दन भंडलकर (रा.गिरवी), गणेश सहदेव शिंदे(रा.निरा नरसिंहपूर) अशी आरोपींची नावे आहेत.हे सर्वजण पिण्याच्या पाण्याचे जार व प्लॅस्टिक ड्रममध्ये हातभट्टीची गावठी दारु भरुन तिची विक्री करत होते. बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारुचा साठा करुन त्याची विक्री करत होते,अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.
सदरील कारवाई पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,सहाय्यक फौजदार शिंदे,हवालदार शुभांगी खंडागळे,पोलीस नाईक कदम, गायकवाड,कळसाईत,पोलीस शिपाई राखुंडे,विशाल चौधर व बारामतीच्या आरसीपी पथकाचे सहाय्यक फौजदार तोंडे व त्यांचे सहकारी आदींनी केली.