इंदापूर

बावडा लाखेवाडी गटामध्ये अंकिता पाटील यांनी पोषण आहार माहिती फलकाद्वारे केली जनजागृती.

संपूर्ण सप्टेंबर महिन्यात देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा होत आहे.

बावडा लाखेवाडी गटामध्ये अंकिता पाटील यांनी पोषण आहार माहिती फलकाद्वारे केली जनजागृती.

संपूर्ण सप्टेंबर महिन्यात देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा होत आहे.

इंदापूर: बारामती वार्तापत्र
दि.1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुपोषणमुक्त भारत साठी “पोषण अभियान” महत्वकांक्षी योजना आहे. बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये व साखर कारखाना परिसर मध्ये या मोहिमेचा भाग म्हणून सकस आणि पोषण आहाराचे महत्त्व सांगणारा माहिती फलकांच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात आली.

बावडा, लाखेवाडी,बोराटवाडी, चाकाटी, पिठेवाडी, निर-निमगाव, कचरवाडी, सराटी, लुमेवाडी, गोंदि, ओझरे, गिरवी, पिंपरी बु,. नृसिंहपुर, भोडणी, वकिलवस्ती, सुरवड, शेटफळ-हवेली, भांडगाव व परिसरातील सर्व ग्रामपंचायती व आरोग्य सेविका, डाॅक्टर यांच्या माध्यमातून जनजागृती अभिमान राबविण्यात येत आहे.

कोरोणा सारख्या गंभीर साथीच्या प्रसंगी देखील पोषण अभियानाची जनजागृती सर्व ग्रामपंचायती, आरोग्य सेविका, डाॅक्टर यांच्या माध्यमातून गावोगावी करत आहेत त्याबद्दल त्यांचे आभार अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी मानले.

Related Articles

Back to top button