इंदापूर

बावडा हलगी ग्रुपला राजवर्धन पाटील यांनी केले ड्रेसचे वाटप

हलगी ग्रुपच्या सदस्यांनी केलं समाधान व्यक्त

बावडा हलगी ग्रुपला राजवर्धन पाटील यांनी केले ड्रेसचे वाटप

हलगी ग्रुपच्या सदस्यांनी केलं समाधान व्यक्त

इंदापूर : प्रतिनिधी

नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बावडा येथील बावडा हलगी ग्रुपला ड्रेसचे वाटप केले. हलगी ग्रुपचे सदस्य रामदास गायकवाड, कुंडलिक गायकवाड तसेच इतर सदस्य यांना राजवर्धन पाटील यांच्या हस्ते निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या ठिकाणी ड्रेसचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्राच्या ग्रामीण सांस्कृतिक परंपरेमध्ये हलगी या वादनास महत्त्वाचे स्थान असून अलीकडे कोरोना पार्श्वभूमीवर कार्यक्रम तसेच उत्सव होत नसल्याकारणाने या पारंपरिक हलगी वाजवणाऱ्या व्यक्तींचे आर्थिक प्रश्न निर्माण झाले असल्याचे मत यावेळी राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.प्रसंगी बावडा हलगी ग्रुपच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करत राजवर्धन पाटील यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram