शैक्षणिक

बिग ब्रेकिंग : दहावीचा निकाल जून अखेर लावू, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री ; वर्षा गायकवाड

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

बिग ब्रेकिंग : दहावीचा निकाल जून अखेर लावू, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री ; वर्षा गायकवाड

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

शालेय शिक्षण मंत्री वर्षागायकवाड यांनी दहावीचा निकाल कसा लावणार याविषयी निकष जाहीर केले आहेत. दहावीच्या निकालाचे निकष जाहीर करताना वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल जूनअखेर लावू असं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं म्हटलं आहे. वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांना सरकसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. अकरावी प्रवेशासाठी पुढील काळात ऑनलाईन सीईटी आयोजित केली जाणर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

शासनाकडून जीआर जारी

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं दहावी परीक्षेसदंर्भात शासननिर्णय काढला आहे. दहावीच्या परीक्षांचा निकाल लावण्यासाठी निकष आज जाहीर करण्यात आले आहेत. यंदा दहावीच्या मूल्यमापन संदर्भात आज जीआर काढला आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात मोठं आव्हान निर्माण झालं होतं. ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण गेले वर्षभर सुरू होत. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. गतवर्षी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नववीच्या मुलांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, पालक, मुख्याध्यापक यांच्याशी 24 बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

दहावी परीक्षेच्या निकालाचे निकष 

वर्षातील लेखी मूल्यमापन – 30 गुण
दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – 20 गुण
नववीचा विषयानिहाय गुण – 50 गुण

दहावीची परीक्षा, निकाल ते 11 वी प्रवेश आणि CET, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

दहावीचा निकाल कसा लावणार?

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल.  शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांचया आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
i. विद्यार्थ्यांचे इ 10वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन 30 गुण देण्यात येतील.
ii. विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन 20 गुण देण्यात येतील.
iii. विद्यार्थ्यांचा इ. 9 वी चा अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दहावीचे निकष जाहीर करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे.  ती म्हणजे गतवर्षी नववीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात आला होता. विद्यार्थ्यांची ही माहिती सरल पोर्टलवर उपलब्ध आहे.

निकालाबाबत समाधानी नसणाऱ्या विदयार्थ्याना दोन संधी

2020-21 चा दहावीचा निकाल कोरोना संसर्गामुळे नव्या निकषांच्या आधारे लावण्यात  येणार आहे. निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. या निकषानुसार  मिळालेले गुण ज्या विद्यार्थ्यांना मान्य नसतील त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत कोरोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर दोन संधी उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

निकाल नियमनासाठी समिती

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शालेय स्तरावर सात सदस्यांची समिती असेल. त्यानंतर विभागीय स्तरावरील अधिकारी निकालाची पडताळणी केली जाईल. एखाद्या ठिकाणी गैर प्रकार झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जून 2021 अखेर निकाल जाहीर करण्यात येईल. खासगी विद्यार्थी, तुरळक विद्यार्थी यांच्यासाठी देखील हे निकष लागू असतील.

अकरावीच्या प्रवेशासाठी  ऑनलाईन सीईटी परीक्षा

अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. यानंतर कनिष्ट महाविद्यालयांकडे ज्या जागा रिक्त राहतील त्या जागावंर जे विद्यार्थी प्रवेश घेणार नाहीत त्यांना प्रवेश देण्यात येईल, असं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्यातील विविध बोर्डांंच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धती वेगळ्या असल्यानं अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

बारावी परीक्षेसंदर्भात काय निर्णय?

बारावी परीक्षेसंदर्भात सीबीएसईसोबत चर्चा करत आहोत. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच आरोग्य आणि सुरक्षा ही राज्य सरकारची प्राथमिकता आहे. केंद्रानं लसीकरणासाठी पुढाकार घेतला पाहिजे.  सीबीएसई बोर्डाचे महाराष्ट्रातील 25 हजार विद्यार्थी  आणि राज्य मंडळाचे 14 लाख विद्यार्थी आहेत. त्यांची सुरक्षा लक्षात घेणं महत्वाचं आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram