स्थानिक

बिग ब्रेकिंग: बारामतीत रात्रीत तीन दुकाने चोरट्यांनी लुटली,व्यापारी वर्गात खळबळ

दुकानांचे सीसीटीव्ही तपासले असता ते बंद

बिग ब्रेकिंग: बारामतीत रात्रीत तीन दुकाने चोरट्यांनी लुटली,व्यापारी वर्गात खळबळ

दुकानांचे सीसीटीव्ही तपासले असता ते बंद

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील मुख्य बाजारपेठे मध्ये असलेल्या तीन दुकानांवर मध्यरात्री चोरटयांनी डल्ला मारून चोरी केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या राजस्थान एस एस,जय हिंद जनरल स्टोअर्स,बी.एल तिवाटणे या दुकानांमध्ये चोरी झाली आहे.विशेष म्हणजे चोरी करताना चोरटयांनी दुकानाच्या टेरेसचा वापर करून दुकानामध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे.राजस्थान एस एस या दुकानमधील जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचा तर जय हिंद आणि बी.एल तिवाटणे मधील काही किरकोळ रोख रक्कम आणि मुद्देमाल हि चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे.अधिक तपास करत असताना आजूबाजूच्या दुकानांचे सीसीटीव्ही तपासले असता ते बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.

चोरी झालेल्या दुकानांमध्ये व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांच्या हि दुकानाचा समावेश असल्यामुळे बारामतीच्या व्यापारी वर्गात तर्क वितर्कना उधाण आले आहे

Back to top button