बिबट्या आला रे – माळेगाव परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत !
रात्रीच्या वेळेस फिरू नयेअसे आव्हान एपीआय विधाते साहेब यांनी केलेले आहे

बिबट्या आला रे – माळेगाव परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ भयभीत !
रात्रीच्या वेळेस फिरू नयेअसे आव्हान एपीआय विधाते साहेब यांनी केलेले आहे
बारामती वार्तापत्र
काल रात्री धाकटे माळेगावच्या दिनकर बाग येथे हद्दीत बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली असून बिबट्याचे ठसे पाहिल्याने माळेगावच्या पोलीस आणि वन विभागाच्या वतीने संयुक्त गस्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
सागर बच्चू पाटील या स्थानिक नागरिकास रात्री नीरा डाव्या कालव्याच्या भरावावरून बिबट्या दिनकर बागेकडे जाताना दिसला, अशी माहिती माळेगाव पोलिसांनी दिली. माळेगावचे सहायक निरीक्षक महेश विधाते यांनी यासंदर्भात आम्ही गस्त सुरू केली असल्याची माहिती दिली.
धाकटे माळेगाव तसेच परिसरामधील नागरिकांनी रात्रीच्या वेळेस फिरू नयेअसे आव्हान एपीआय विधाते साहेब यांनी केलेले आहे कृपया नागरिकांनी काळजी घ्यावी
दरम्यान वन विभागाने देखील या ठिकाणच्या ठशांची पाहणी करून येथे गस्तीस सुरुवात केली आहे. तसेच लोकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
तसेच वन विभागाचे धाकटे माळेगाव येथे पेट्रोलींग चालू आहे कृपया त्या भागामध्ये पहाटे व्यायाम लाजाणाऱ्या नागरिकांनी जाऊ नये असे आव्हान वन विभागाने केले आहे.