बीड येथील एल्गार मेळाव्यासाठी इंदापूरमध्ये नियोजन बैठक
ओबीसी नेते पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली..

बीड येथील एल्गार मेळाव्यासाठी इंदापूरमध्ये नियोजन बैठक
ओबीसी नेते पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली..
इंदापूर,आदित्य बोराटे –
१७ सप्टेंबर रोजी बीड येथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी राज्यभर ओबीसी बांधवांकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 13) ऑक्टोंबर रोजी शहरातील श्री.संत सावतामाळी मंदिरात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या नियोजन बैठकीला इंदापूर तालुक्यातील आणि परिसरातील मोठ्या प्रमाणावरती ओबीसी बांधवांनी उपस्थिती लावली. यावेळी बापूसाहेब भुजबळ, पांडुरंग शिंदे, रमेश शिंदे, बाबजी भोंग, तानाजी धोत्रे, विकास शिंदे, अक्षय शिंदे यांनी उपस्थित ओबीसी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करताना बीड येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी विकास शिंदे, युसुफभाई बागवान, हनीफ कुरेशी, राजू गार्डे, शिवाजी सातव, प्रकाश पवार, पंकज राऊत, मयूर शिंदे, सचिन शिंदे, विशाल राऊत, गोविंद बोराटे, गणेश राऊत, अमोल राऊत, नवनाथ शिंदे, बापू शिंदे, मोहन शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.