स्थानिक

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क वतीने साकेत,विरासत बचाव चे अभियान.

बुद्धकालीन अवशेषांचे सरंक्षण करण्याच्या मागणी.

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क वतीने साकेत,विरासत बचाव चे अभियान.

बुद्धकालीन अवशेषांचे सरंक्षण करण्याच्या मागणी.

बारामती : वार्तापत्र आज बारामती येथे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीने ‘साकेत बचाव,विरासत बचाव’ या अभियानांतर्गत अयोध्येतील राम मंदिराच्या विवादित जागे चे पुनरुत्खनन करून त्या ठिकाणी सापडलेल्या बुद्धकालीन अवशेषांचे सरंक्षण करण्याच्या मागणी करीता आज बारामती येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले व ह्या राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ दुसऱ्या टप्प्यात बारामतीत तहसीलदारांना निवेदन देऊन मा.राष्ट्रपती आणि मा. भारत सरकार यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथे राम मंदिराचे भूमी सपाटीकरण करीत असताना.जमिनीमधून राम मंदिराचे नाहीतर बौद्ध विहाराचे अवशेष जसे की पदम चिन्ह, अजिंठा लेणी येथील बुद्धाच्या चित्राच्या प्रतिमा इत्यादीचे अवशेष मिळालेले आहेत या बाबत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीने असा दावा करण्यात आला आहे की आयोध्या हे प्राचीन भारतातील साकेत हे शहर होते. बुद्ध धम्माचे तेथे प्राचीन प्रमुख केंद्र होते.

गौतम बुद्धांनी अनेक वेळा तेथे धम्मावर प्रवचन देऊन वर्षावास केला होता. या संदर्भात सम्राट अशोकाने या जागेवर धम्माच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन तेथे विहार बांधले होते. पण सम्राट अशोकानंतर पुष्यमित्र शुंग याने सम्राट अशोकाचे नातू बृहरथ याचा खून करून साकेत या ठिकाणी आपली राजधानी वसवली व साकेत वर कब्जा केला.साकेत वर कब्जा करण्यासाठी पुष्यमित्र शृंगाला युद्ध न करावे लागल्याने त्याने साकेत चे नाव अयोध्या ठेवले होते.ह्या सर्व ऐतिहासिक घटनांचे दाखले देतच.

अयोध्या येथील मदींराची २.७७ एकर व उर्वरित ६७ एकर जागेच योग्य प्रकारे उत्खनन करून ती जागा बौद्धां कडे हस्तांतरित करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असल्याची माहिती भारत मुक्ती मोर्चा चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.सुशिल अहिवळे यांनी दिली.

ह्या आंदोलनाला मानव एकता युवक संघटना आणि शेरसुहास मित्र मंडळ,एस.एस.एस.ग्रुप यांनी देखील पाठिंबा दर्शविला दरम्यान यावेळी प्रा.डी.व्ही सरोदे,सिध्दार्थ लोंढे, नितीन गव्हाळे,दत्तात्रय रणदिवे,विकास जगताप,भावीन सोनवणे,निलेश रणदिवे,सेजल अहिवळे,प्रेरणा अहिवळे,पार्थ कांबळे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram