बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ, कोट्यवधींची संपत्ती ED कडून जप्त
200 कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंग प्रकरणाशिवाय याआधीही त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले होते.
बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ, कोट्यवधींची संपत्ती ED कडून जप्त
200 कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंग प्रकरणाशिवाय याआधीही त्याने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले होते.
मुंबई,प्रतिनिधी
बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिच्यावर ईडीने कारवाई केली आहे. जॅकलिनवर ईडीची मोठी कारवाई आहे.
ईडीने जॅकलिन फर्नांडिसची संपत्ती जप्त केली आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे, कॉनमन सुकेश चंद्रशेखर ज्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे ती फिक्स्ड डिपॉझिट असल्याची माहिती ANI ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
जॅकलिनला महागड्या भेटवस्तू
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केल्यानंतर तिला सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्याचे आढळून आले. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात आहे. सुकेश चंद्रशेकरने जॅकलीन फर्नांडिसला प्रपोज करुन हिऱ्याची अंगठी दिल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे. या हिऱ्याच्या अंगठीवर J आणि S ही अक्षरे होती.
सुकेशसोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल
जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेश चंद्रशेखर यांचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो आल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची अटकळ बांधली जात होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही समोर आले आहे की अभिनेत्रीला सुकेशकडून करोडोंची भेट देखील मिळाली होती, ज्यामध्ये 9 लाख रुपये किमतीचा घोडा आणि 52 लाख किमतीची पर्शियन कार होती.