बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन
प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांचे निधन झाल्याची माहिती ही समाज माध्यमांवर दिली आहे
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन
प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांचे निधन झाल्याची माहिती ही समाज माध्यमांवर दिली आहे
प्रतिनिधी
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांचे निधन झाल्याची माहिती ही समाज माध्यमांवर दिली आहे. हंसल मेहता यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.
अनेक चित्रपटात निभावली भूमिका –
युसूफ हुसैन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात, मालिकेत काम केले आहे. ‘दिल चाहता है’, ‘ओह माय गॉड’, ‘दबंग ३’, ‘धूम’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका निभावली. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.
हंसल मेहता यांनी ट्वीटरवर भावनिक पोस्ट –
हंसल मेहता यांनी ट्वीटरवर भावनिक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘युसूफ साहब हे माझे सासरे नव्हते तर माझे वडील होते. त्यांनी दिलेली शिवकण नेहमी आठवणीत राहिल. त्यांच्या जाण्याने मी पोरका झालो आहे अशा आशयाची एक पोस्ट लिहून हळहळ व्यक्त केली आहे.
युसूफ हुसैन यांची कारकिर्द
युसूफ हुसैन यांनी आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि टेलिव्हीजन मालिकेत काम केले आहे. त्यांनी २००२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अब के बरस’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘विवाह’, ‘दिल चाहता है’, ‘राज’, ‘हजारों ख्वाईशे ऐसी’, ‘धूम’, ‘शाहिद’, ‘रईस’, ‘दबंग ३’, ‘द ताश्कंद फिल्म्स’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तर ‘तुम बिन जाऊ कहां’, ‘कुमकुम: एक प्यारा सा बंधन’, ‘सीआयडी’, ‘श्श्शू… कोई है’ यासारख्या मालिकेतही भूमिका साकारल्या आहेत.