बोर्ड लावून बारामती विद्रुप करू नका;अजितदादा संतापले
इंदोर शहराच्या धर्तीवर शहराचा विकास करण्याचा मानस

बोर्ड लावून बारामती विद्रुप करू नका;अजितदादा संतापले
इंदोर शहराच्या धर्तीवर शहराचा विकास करण्याचा मानस
बारामती वार्तापत्र
अनधिकृत बॅनरबाजी करणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश अजित पवारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. ते म्हणाले की, “मिकाल संभाजीनगरला होतो, तिथे सार्वजनिक ठिकाणी एक पोस्टर लागत नाही, हायकोर्टाचे आदेश आहेत. इथे अजित पवारचा वाढदिवस असला तर एक जरी पोस्टर लावला तरी काढायचे आणि जप्त करायचे.
अजित पवारपासून सुरुवात करा. कोणाचे लाड ठेवू नका. आपले जे ऑथेंटिक बोर्ड आहेत तिथे कोणाला लावायचे आहेत तिथे लावा असं सांगा आपलं शहर विद्रूप करू नका.”इंदोर शहराच्या धर्तीवर बारामती शहराचा विकास करण्याचा मानस व्यक्त करुन श्री. पवार म्हणाले, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात येणार आहे.
शहरात स्वच्छता राहिली पाहिजे, कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखली पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी. याकरिता नागरिकांनी प्रशासनाच्यावतीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे,
नागरिकांना सर्व प्रकारच्या सोई-सुविधा मिळवून देण्याकरिता तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच विकास कामाच्या अनुषंगाने विधायक सूचनाही कराव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.