इंदापूर

ब्राह्मण समाजातील सर्वच घटकांना मदत करणार : आशिष दामले

ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने दामले यांचा सत्कार

ब्राह्मण समाजातील सर्वच घटकांना मदत करणार : आशिष दामले

ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने दामले यांचा सत्कार

इंदापूर; प्रतिनिधी

शासनाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.” अशी ग्वाही परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी दिली.

इंदापूरात ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने दामले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरीष जोशी होते. दामले म्हणाले, “परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय पुणे येथे सुरू करण्यात आले. महामंडळाच्याविविध योजना तयार करण्यात आल्या असून त्याच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या आहेत. ब्राह्मण समाजातील सर्व घटकांसाठी या योजनेत समावेश आहे.”

यावेळी प्रसाद जोशी, गजानन पुंडे, प्रसन्न दुनाखे यांनी समाजाच्या वतीने सूचना मांडल्या. यावेळी उदय देशपांडे, किरण गनबोटे, गणेश महाजन, मोहन गोसावी, अमोल उन्हाळे, सुहास जकाते, विनय देशपांडे, राजेंद्र जोशी, गोविंद कुलकर्णी, विनय देशपांडे, अनिल सोनटक्के आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button