राजकीय

ब्रेकिंग न्यूज;बारामतीतील तीन अपक्ष नगरसेवकांनी दिला राष्ट्रवादीला पाठिंबा

पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपालिकेतील ताकद आणखी वाढली

ब्रेकिंग न्यूज;बारामतीतील तीन अपक्ष नगरसेवकांनी दिला राष्ट्रवादीला पाठिंबा

पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपालिकेतील ताकद आणखी वाढली

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर आज नगरपालिकेतील गटनेते, उपगटनेते तसेच विविध समित्यांच्या प्रभारी पदांची निवड करण्यात आली. या प्रक्रियेमुळे नगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अशा परिस्थितीत नगरपालिकेतील निवडून आलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. सौ.वनिता अमोल सातकर, निलेश भारत इंगुले आणि सौ.मनिषा संदीप बनकर या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत सत्ताधारी गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपालिकेतील ताकद आणखी वाढली असून विरोधकांची संख्या कमी झाली आहे. परिणामी विरोधी पक्षनेतेपदाबाबतची चर्चा आता अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. राष्ट्रवादीला मिळालेल्या या पाठिंब्यामुळे आगामी काळात नगरपालिकेतील निर्णयप्रक्रियेत सत्ताधारी गटाचा प्रभाव अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पुढील काळात आणखी काही नगरसेवक सत्ताधारी गटात सामील होतील का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button