आपला जिल्हा

वीर जवान पिंटू राजाराम सुळ यांना साश्रू नयनांनी निरोप

देश सेवा करत असताना आले वीरमरण

वीर जवान पिंटू राजाराम सुळ यांना साश्रू नयनांनी निरोप

देश सेवा करत असताना आले वीरमरण

बारामती वार्तापत्र
कोऱ्हाळे तालुका बारामती येथील वीर जवान बिंटु राजाराम सुळ यांना काश्मीर येथे मंगळवारी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले.

जवान पिंटू सूळ यांनी सैन्यदलात 14 वर्ष सेवा केली होती. त्यानंतर पुन्हा त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. त्यांचे पार्थिव मूळगावी कोऱ्हाळे येथे आणण्यात आले होते.

गावातून शोकाकुल वातावरणात त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरम
पिंटू सुळ अमर रहे अशा घोषणा गावकरी देत होते.संपूर्ण गाव शोकाकुल झाला होता. देशासाठी या जवानाने आपले बलिदान दिले.
जवान बिंटु राजाराम सूळ यांच्या मागे आई ,वडील ,पत्नी ,दोन मुले ,दोन भाऊ असा परिवार आहे.

Back to top button