ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आला आहे- किरण गुजर
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती द्यावी अजित पवार गटाची मागणी

ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आला आहे- किरण गुजर
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती द्यावी अजित पवार गटाची मागणी
बारामती वार्तापत्र
एकीकडे बारामती तालुका पोलीस स्टेशन समोर आमदार रोहित पवार हे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी येणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आल्याची माहिती दिली जाते आहे कोणीही तपासाबाबत विसंगती निर्माण करू नये असं देखील त्यांनी म्हटले आहे .राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर, नगराध्यक्ष सचिन सातव ,तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या उपस्थितीत बारामती शहरातील शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी भवन येथेही पत्रकार परिषद घेण्यात आली.
कालच डीजीसीए आणि एएआयबी यांचा काल ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आला आहे. पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ,सुनील तटकरे ,प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी यांनी केलेली आहे
त्या संदर्भातली कार्यवाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केली आहे.
11 फेब्रुवारी रोजी जय पवार यांनी देखील मागणी केली होती त्यावर कालच अहवाल येऊन कार्यवाही सुरू झाली आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागणी करतो की त्या तपासाला गती मिळावी सीबीआय चौकशी देखील गतिमान तिने व्हावी. त्या संदर्भातला अहवाल येऊन योग्य ती कार्यवाही व्हावी. ज्यांच्या विरोधात हा अहवाल समोर येईल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची आमची देखील मागणी आहे.
कोणत्याही मागणीच्या अहवालाला विलंब होतो हे आपल्या हातात नसून यासाठीची स्वतंत्र यंत्रणा असून तपास करताना टेक्निकल बाजू देखील तपासावे लागतात. ब्लॅक बॉक्सच्या बाबत बातम्या खऱ्या किंवा खोट्या हे आपल्याला माहिती नव्हतं मात्र कालच अहवाल आला आहे की ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. आलेला अहवाल ग्राह्य करायला हवा.
ऑन आमदार रोहित पवार मागणी
आमची देखील त्यांच्यासारखीच मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा अजितदादांचा गटाने ऑलरेडी सुनेत्रा पवार यांनी आणि आम्ही मागणी केली आहे. त्या संदर्भातली कार्यवाही मुख्यमंत्री फडणवीस करतील. गती मिळावी हीच आमची मागणी आहे.
तपासाला गती देण्यासाठी आपल्यामध्ये विसंगती न होता गती मिळावी विसंगती होऊ नये संभ्रम निर्माण होऊ नये हीच आमची मागणी आहे.






