भंडारा येथील रुग्णालय आगीत दहा बालकांचा मृत्यू
धुराने गुदमरून दहा बालकांचा मृत्यू
बारामती वार्तापत्र
भंडारा येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील नवजात बालकांच्या विभागात शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत गुदमरून 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.
काल रात्री सरकारी दवाखान्यातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीने लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात धूर गेल्यामुळे तेथील दहा लहान मुलांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.
घटनेच्या ठिकाणी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रमोद खंडाते ,पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेमुळे संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला आहे. अचानक झालेल्या या आगीच्या तांडवामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.