भक्तीमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भागवत कथा संपन्न
सध्याचे १४ वे वर्ष होते.

भक्तीमय वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भागवत कथा संपन्न
सध्याचे १४ वे वर्ष होते.
बारामती वार्तापत्र
भक्तीमय वातावरणात कै.ह.भ.प. भगवानराव बाबुराव तावरे यांनी बांधलेल्या श्रीराम मंदिरामध्ये भाविकांच्या भक्तीच्या अलोट गर्दीत श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाल्याचे ऍड.हरिष भगवानराव तावरे यांनी कळविले आहे. सध्याचे १४ वे वर्ष होते.
भागवत कथेचे प्रवक्ते आळंदीचे ह.भ.प. भागवताचार्य बाळासाहेब महाराज पवार यांनी आपल्या वाणीतून सर्व भक्तांना मंत्रमुग्ध केले.
शनिवार दि.१६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते १० वा. श्री हनुमान अभिषेक व महाप्रसाद सायं. ७ ते १० वाजेपर्यंत श्रीराम उद्योगभवन येथे झाल्याचे चि.ऋषिकेश हरिष तावरे यांनी सांगितले आहे.
या संपूर्ण सप्ताहामध्ये सेवेकरी आणि भाविक भक्तांची चहा व अल्पोपहार, जेवण व महाप्रसादाची सोयी श्रीमती ह.भ.प.सिंधुताई भगवानराव तावरे यांचे वतीने करण्यात आली असल्याचे पांडूरंग तावरे यांनी कळविले आहे.
वै.ह.भ.प.भगवानराव बाबुराव तावरे यांच्या पश्र्चात अखंडित त्यांची मुले पांडूरंग तावरे, ऍड.हरिष तावरे व नातू ऋषिकेश हरिष तावरे तेवढ्याच जोमाने, भक्तीने गोकुळ अष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह करीत असल्याचे कौतुक येणार्या भाविक भक्तांमधून केले जात आहे.
रोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, दुपारी ३ ते ६ संगीतमय श्रीमद भागवत कथा, सायं. ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ श्रीहरी किर्तन व नंतर हरिजागर हे दैनंदिन कार्यक्रमामुळे सर्व भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
या सप्ताहाला ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज मेहुणकर (आळंदी), ह.भ.प.आबा सोनटक्के (बारामती), ह.भ.प. ढवळे महाराज (बारामती) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दि.१० ऑगस्ट रोजी सप्ताहाला प्रारंभ होऊन १६ ऑगस्ट २०२५ रोजी सांगता करण्यात आली.
या कालावधीत खालील कीर्तनकार यांचे कीर्तन झाले ह.भ.प.बाळासाहेब महाराज पवार , ह.भ.प. श्रुष्टि महाराज भोंग , ह.भ.प.अशोक महाराज घाडगे (शांतीदासनगर)ह.भ.प.शरद महाराज घोळवे (निंबोडि), ह.भ.प. गणेश महाराज धुमाळ शिंदे वाडी , दि १५ ऑगस्ट रोजी ह.भ.प.कृष्णा महाराज मेहुणकर (आळंदी )यांचे कृष्ण जन्माचे दि १६ ऑगस्ट रोजी ह.भ.प. संजय महाराज सायकर (राशीन) यांचे काल्याचे किर्तन झाले.
गायनाचार्य किर्तनसाथ, मृदंगाचार्य व तबलावादक, विणेकरी, आचारी, वायरमन, मंडप व्यवस्था व मंदिराचे सेवेकरींचे श्री भालेराव गुरुजी ऍड.हरिष तावरे यांनी आभार मानले.