भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
मोफत ई-श्रम कार्ड व पोलीस भरतीपूर्व प्रक्षिणार्थी विद्यार्थ्यांना किटचे वाटप
भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
मोफत ई-श्रम कार्ड व पोलीस भरतीपूर्व प्रक्षिणार्थी विद्यार्थ्यांना किटचे वाटप
इंदापूर : प्रतिनिधी
भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे यांचा वाढदिवस गुरुवारी (दि.१७) सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.याप्रसंगी मोफत ई-श्रम कार्ड व पोलीस भरतीपूर्व प्रक्षिणार्थी विद्यार्थ्यांना किटचे वाटप गटविकास अधिकारी विजयकुमार परिट,भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवानराव भरणे प्रतिष्ठानकडून नेहमीच मोठ्या आपुलकीने व हक्काने मदतीचा हात पुढे केला जातो.त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भरणेवाडी चे सरपंच दिपक भरणे,प्रगतशील बागायतदार निलेश धापटे-पाटील,दिपक गलांडे,नागेश धुमाळ यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य, प्रशिक्षणार्थी व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून अनिकेत भरणे यांना शुभेच्छा दिल्या.तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक,आर्थिक,आरोग्य तसेच शैक्षणिक मदतीबद्दल आभार व्यक्त केले.