भगवे वादळ चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांकरिता इंदापूर बायपास या ठिकाणी रास्तारोको.
नायब तहसीलदार यांच्याकडे दिले मागण्यांचे निवेदन.

भगवे वादळ चालक मालक विद्यार्थी वाहतुक संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांकरिता इंदापूर बायपास या ठिकाणी रास्तारोको.
नायब तहसीलदार यांच्याकडे दिले मागण्यांचे निवेदन.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
देशात व राज्यात आलेल्या कोविड 19 च्या महामारीमुळे महाराष्ट्रातील सर्व स्कूल बस चालक-मालक धारकांवर उपासमारीची वेळ आली असून संघटनेच्या वतीने आज दि.10 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान इंदापुर येथील डोंगराई हॉटेल पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी विविध घोषणा देत खालील मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अभंगराव यांच्याकडे देण्यात आले.
१. बँक व फायनान्स कंपनीचे कर्ज एक वर्षासाठी स्थगित करण्यात यावे.
२. येणारे शैक्षणिक सत्र 2020-21 हे शासकीय अनुदानातून पूर्णतः पासिंग करून देण्यात यावे.
३. जोपर्यंत लॉक डाऊन पूर्णता संपत नाही, तोपर्यंत प्रत्येक बस चालक-मालक धारकास १०,००० रुपये प्रतिमहिना अनुदान देण्यात यावे.
४. जोपर्यंत शाळा पूर्णतः सुरू होत नाहीत तोपर्यंत आम्हाला एसटी बस थांब्या पासून शंभर किलोमीटर अंतरापर्यंत आमच्या स्कूल बसने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात यावी.
५. शासनाने स्कूल बसच्या नियमावलीत फेरबदल करण्यापूर्वी आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करावा.
या सर्व मागण्यांचा शासनाने सहानभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा तसेच चालक मालक संघटनेच्या मागण्याचा अद्याप विचार झालेला नसल्याने,नाईलाजाने रास्ता रोको करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले असून न्याय मिळाला नाही तर या नंतरचे आंदोलन उग्र स्वरूपाचे असेल असे ही म्हंटले आहे.
या वेळी महाराष्ट्र राज्य भगवे वादळ चालक मालक संघटनेचे लक्ष्मीकांत वाघे,महादेव कोकाटे, दादासाहेब जगताप,कुमार गायकवाड, दादासाहेब ढोले,अतुल ढोले,अतुल सुळ, सिध्दनाथ जगदाळे, गणेश शेटे, बबन पवार,राम लांडे व अन्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.