भल्या पहाटे बारामती शहर पोलीसांची जळोची मार्केट यार्ड येथे विनामास्क नागरिकांवर कारवाई
5 फूट अंतर ठेवून व्यवहार करण्या बाबद प्रबोधन करण्यात आले.
भल्या पहाटे बारामती शहर पोलीसांची जळोची मार्केट यार्ड येथे विनामास्क नागरिकांवर कारवाई
5 फूट अंतर ठेवून व्यवहार करण्या बाबद प्रबोधन करण्यात आले.
बारामती वार्तापत्र
कोरोनाचा संसर्ग कसा रोखणार ? सरकार व आरोग्य विभाग वारंवार नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन करत आहे. मात्र, नागरिकांकडून याला केराची टोपली दाखवली जात आहे तर कोरानाचा संसर्ग आटोक्यात येणार का?
नागरिक गर्दीच्या व इतर ठिकाणी मास्कचा वापर करताना दिसत नाहीत, त्यामुळे नागरिकांना आता सांगायचे कसे असा प्रश्न
उपस्थित होत आहे.
बारामती तालुक्यातील मार्केट यार्ड जळोची या ठिकाणी असलेली , मोठी गर्दी होत असते. अशा बाजारपेठेत अनेकदा विनामास्क वावरताना नागरिक दिसून येत आहेत. एकीकडे काही नागरिकांचे लसीचे दोनही डोस झालेले आहेत तर काही नगरिकांचा एक डोस झाला आहे. मात्र शहरात अजून असेही नागरिक आहेत की, ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही
बरेच लोकांनी माहिती दिली होती की मार्केट यार्ड जळोची या ठिकाणी अनेक खेडेगावातून शेतकरी शेतीमाल विकण्यासाठी येतात व व्यापारी सुद्धा माल खरेदीसाठी येत असतात. दलाल त्या ठिकाणी गर्दी करून सदर शेतीमालाचा नीलाव करतअसतात परंतु याठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नाही व मास्क सुद्धा लावली जात नाही.
त्यामुळे अशा नागरिकांना लसीकरण करून घ्यावे हे कधी कळणार ? लसीचे दोन्हीही डोस घेतलेल्या नागरिकांना सध्या कोरोना
गेल्यासारखे वाटत आहे. आपले दोन्ही डोस झाले असल्याच्या फुशारकीमध्ये तोंडावर मास्क लावत नाहीत. दोन्ही डोस झालेल्या नागरिकांनी देखील मास्क लावून कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
शासकीय नियमावलीचा शहरात फज्जा उडताना दिसत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर आजही नागरिक गर्दी
करताना दिसून येत आहे. लग्नसमारंभ, अंत्यविधी, दशक्रिया वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आजही गर्दीत होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यापुढे रुग्णसंख्या वाढली तर जबाबदार कोण?
त्यावेळेस आज सकाळी साडे पाच वाजल्यापासून सपोनि उमेश दंडीले व त्यांच्यासोबत ASI काळे, गुपचे पवार यांचा स्टाफ देऊन त्या ठिकाणी प्रथम विनामास्क लोकांवर दंडात्मक दहा कारवाई करण्यात आले व नंतर मुख्य पट्टी लावण्याबाबत वारंवार हात साबण किंवा सेनीटायगर नी धुण्याबदल व कमीत कमी 5 फूट अंतर ठेवून व्यवहार करण्या बाबद प्रबोधन करण्यात आले.