भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर पुन्हा जोरदार टीका, ३० वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का झाला नाही?

भाजप-राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढला

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर पुन्हा जोरदार टीका, ३० वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का झाला नाही?

भाजप-राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढला

प्रतिनिधी

मागच्या तीस वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. शरद पवार यांनी रविवारी उस्मानाबादमध्ये केलेलं भाषण ऐकून मी आवाक झालो असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवारांवर त्यांनी त्यांच्या खास शैलीत टीकाही केली आहे.

सांगलीत उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळ्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते २ एप्रिल रोजी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादीने केलं आहे. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आज भाजपचे नगरसेवक आणि आमदारांची बैठक पार पडली.

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते होण्यापूर्वीच २६ मार्च रोजी भाजप नेत्यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करावं, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे स्मारकाचे लोकार्पण आणि श्रेयवादावरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

काल काय म्हणाले होते शरद पवार?

‘निवडणुकीच्या आधीच मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन सांगत होते. मी त्यांना येऊच दिलं नाही.’ असं वक्तव्य शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उस्मानाबादमध्ये होता. त्यामुळे शरद पवार या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी फडणवीसांना हा टोला लगावला आहे. ‘उद्धव ठाकरे हे खूप चांगलं काम करत आहेत’ असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जेव्हा भाजपकडून सुरू होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन ही घोषणा दिली होती. ती घोषणा म्हणजे त्यांच्या भाषणाची ओळखच झाली होती. भाषण संपवत असताना ते ही घोषणा देत होते. तसंच शरद पवारांचं राजकारण आता संपलं आहे अशीही टीका त्यांनी त्यावेळी केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस पुन्हा येऊ शकले नाहीत. आता त्या पुन्हा येईनच्या घोषणेवरूनच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

शरदचंद्र पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे सन्माननीय पवार साहेब हताशपणे बोलले असतील.आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा राग यामुळेच आहे की माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्रजींनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच प्रस्थापितांचा तीळपापड होतोय असं पडळकर म्हणाले.

त्यानंतर पडळकर म्हणाले की, ‘आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्रजी यांच्या नजरेत खुपतात. मी पवार साहेबांना सांगू इच्छीतो की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ अशी एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात पावसात भिजून सुद्घा फक्त ५४ च आमदार निवडून आले.त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडून दिले अशा खोट्या थापा मारू नका. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीस वर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही.सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं. असा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram