भाजपचे आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली, कोल्हापूरला नेले जाणार!

सिंधुदुर्गातून थोड्याच वेळात 108 रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात नेले जाणार आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली, कोल्हापूरला नेले जाणार!

सिंधुदुर्गातून थोड्याच वेळात 108 रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात नेले जाणार आहे.

सिंधुदुर्ग :प्रतिनिधी

भाजपचे आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना काही वेळात कोल्हापूरला नेले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी केली जणार आहे. आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यांना पुन्हा न्यायालयनी कोठडी मिळणार की जामीन याचीही उत्सुकता आहे.

कार्डियाक सिस्टीम उपलब्ध नसल्यानं कोल्हापूरमध्ये तपासणी केली जाणार आहे. नितेश राणे यांना काल रात्री न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांना कणकवलीहून ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केल होतं. रक्तदाब वाढल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

संतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या नितेश राणे यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांच्यासमोर ही सुनावणी झाली. आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार होती. परंतु, सरकारी वकिलानं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितली आहे. ज्यामुळं नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी किंवा मंगळवारी होणार सुनावणी होणार आहे. नितेश राणेंची चौकशी करून माजी आमदार आणि भाजपचे नेते प्रमोद जठार जिल्हा सत्र न्यायालयात आले आहेत.

Related Articles

Back to top button