विद्या प्रतिष्ठान च्या विद्यार्थ्यां कडून मधुमेह आणि कोलेस्टेरॉल व्यवस्थापनासाठी कार्य
जैवतंत्रज्ञान विभागाची मानवी जीवनासाठी म्हतपूर्ण कामगिरी

विद्या प्रतिष्ठान च्या विद्यार्थ्यां कडून मधुमेह आणि कोलेस्टेरॉल व्यवस्थापनासाठी कार्य
जैवतंत्रज्ञान विभागाची मानवी जीवनासाठी म्हतपूर्ण कामगिरी
बारामती वार्तापत्र
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक रुग्ण मधुमेह व रक्तदाब च्या समस्येने ग्रासले आहेत अशा वेळी मधुमेह आणि कोलेस्टेरॉल व्यवस्थापनासाठी एकत्रित परिणाम देईल या साठी प्रयोग करून मानवी जीवनासाठी आशेचा किरण दिसत आहे.
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागात शिक्षण घेत असलेल्या कु. मृणाल समीर दाते सध्या एम.एस्सी. जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रम करत आहेत. त्यांनी मधुमेहाच्या उपचारासाठी जिमनेमा सिल्वेस्ट्रे (गुड़मार)आणि बीटा सिटोस्टेरॉल(वनस्पती स्टेरॉल) वापरून हर्बल औषधाची रचना करण्यावर प्रयोगातून यशस्वी रचना केली.
मॉलिक्युलर डॉकिंग च्या यशस्वी प्रयोगांद्वारे त्यांनी प्रोटीन काइनेज सी डेल्टा आणि एच. एम. जी व सी. ओ. ऐ. रिडक्टेस या एन्झाइम्सच्या निरोधकांच्या स्वरूपात प्रयोग करून आशादायक परिणाम पाहिले त्यानंतर प्रोटीन काइनेज सी डेल्टा चे अतिसक्रिय होणे मधुमेहाच्या धोक्याचे प्रमाण वाढवते, तर एच. एम. जी व सी. ओ. ऐ. रिडक्टेस हे कोलेस्टेरॉल निर्मितीत महत्त्वाचे एन्झाइम आहे हे सिद्ध केले.
बीटा सिटोस्टेरॉल सह एच. एम. जी व सी. ओ. ऐ. रिडक्टेस चा संयोग वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो ही ही महत्वपूर्ण बाब प्रयोगातून सिद्ध केली जिमनेमिक ऍसिड आणि बीटा सिटोस्टेरॉल यांचा संयोग मधुमेह आणि कोलेस्टेरॉल व्यवस्थापनासाठी एकत्रित सकारत्मक परिणाम देईल.
हे संशोधन विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. राजेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून डॉ. शर्मा यांचे मधुमेहविषयक ५२ संशोधन प्रकाशित झाले आहेत आणि त्यांच्याकडे २ पेटंट्स आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली मृणाल दाते संशोधन करीत आहेत.
चौकट:
मधुमेह व उच्च रक्तदाब या साठी संशोधन चालू असताना भारत सरकारच्या मदतीने पेटंट पेटंट मिळवण्यासाठी आणि त्यानंतर त्याचे औषधांमध्ये रूपांतर करून बाजारामध्ये आणण्याचा प्रयत्न यशस्वी होईल
डॉ.राजेश शर्मा विद्या प्रतिष्ठान जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख