भाजपच्या वतीने विविध मागण्यांसाठी शेळगाव फाटा येथे रास्ता रोको
मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
भाजपच्या वतीने विविध मागण्यांसाठी शेळगाव फाटा येथे रास्ता रोको
मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर-बारामती रस्त्यावरील शेळगाव फाटा येथे बुधवारी (दि.४) सकाळी भाजपचे पदाधिकारी माऊली चवरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेळगाव ते निमगाव रस्त्यावरील पूल दुरुस्त करावा व पर्यायी रस्ता द्यावा, कडबनवाडी- शेळगाव- रुई रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रू.४ कोटीचा निधी दिलेल्या रस्त्याचे संपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, कडबनवाडी येथील चिंकारा अभय वन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी रद्द करण्यात यावे तसेच शेळगाव येथील संत मुक्ताबाई मंदिरासमोरील १०० वर्षांपूर्वीची धोकादायक इमारत ग्रामस्थांनी ठराव करून देखील न पाडणाऱ्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी करण्यात आल्या. याबाबत निमगाव केतकीचे मंडल अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.
शासनाने वरील मागण्यांची तातडीने दखल घेऊन पूर्तता करावी अन्यथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी बोलताना माऊली चवरे व इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.
सदरील रास्ता रोको आंदोलनामध्ये विठ्ठल जाधव, मोहनराव दुधाळ, भागवत भुजबळ, धनाजी ननवरे, आकाश कांबळे, पांडुरंग शिंदे, राजकुमार जठार, आबासाहेब थोरात, ललित होले, शिवाजी शिंगाडे, राहुल जाधव व भाजपचे कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले होते.