आपला जिल्हा

भाजपाच्या युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीसपदी ॲड. मयुर शिंदे 

पक्ष श्रेष्ठींकडून जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी..

भाजपाच्या युवा मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीसपदी ॲड. मयुर शिंदे 

पक्ष श्रेष्ठींकडून जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी..

इंदापूर,आदित्य बोराटे – 

पुणे जिल्हा (दक्षिण) युवा मोर्चाच्या सरचिटणीस पदी ॲड.मयुर रघुनाथ शिंदे यांची गुरुवारी (दि.४) जून रोजी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

भाजपाचे युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) वैभव बापुराव सोलनकर यांच्या हस्ते ॲड. मयुर रघुनाथ शिंदे यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले. यापूर्वी पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्याने त्यांना ही पक्ष श्रेष्ठींकडून जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.या पदी निवड झाल्याने शिंदे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिंदे म्हणाले की,आपण भाजप पक्ष वाढविण्यासाठी गावागावात काम केले आहे,येणाऱ्या काळात याही पेक्षा अधिक काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.युवा मोर्चाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती व लाभ ग्रामीण भागातील जनसामान्यांना ॲड.मयुर रघुनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अधिकाधिक होईल असा विश्वास व्यक्त करून शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांना ही संधी दिल्याने त्यांनी युवा मोर्चाचे पुणे जिल्हाधक्ष (दक्षिण) वैभव सोलनकर यांचे आभार मानले आहेत.

याबद्दल त्यांचे वैभव बापुराव सोलनकर (युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष,भाजप),सुदर्शन मखरे,अमित साळवे,अमर गडदे,सौरभ सरतापे, केवल मखरे, गणेश जाधव,सागर शिंदे,आदींनी अभिनंदन केले आहे.

Back to top button