भाजपा सरकार अविश्वासहार्य ;युपी व पंजाबची निवडणूक समोर ठेवून निर्णय – ॲड.राहुल मखरे
रद्द करण्यात आलेल्या निर्णयावर केलं मत व्यक्त
भाजपा सरकार अविश्वासहार्य ;युपी व पंजाबची निवडणूक समोर ठेवून निर्णय – ॲड.राहुल मखरे
रद्द करण्यात आलेल्या निर्णयावर केलं मत व्यक्त
इंदापूर : प्रतिनिधी
शेतकरी,कामगार, विद्यार्थी यांची भाजपा सरकारने फसवणूक केली आहे.कृषी कायदे रद्द करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा उत्तरप्रदेश व पंजाब निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला आहे.त्यामुळे हे सरकार अविश्वासहार्य आहे असे मत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांनी व्यक्त केलं आहे.
मखरे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी भाजप पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात जातीनिहाय जनगणना करू अस म्हंटल होत परंतु निवडणूक झाल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं की आम्ही जातीनिहाय जनगणना करणार नाही.तसेच ३१४ आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना या सरकारने घरी बसवलं त्यामुळे भाजपाचे सरकार विश्वासास पात्र नाही.आजचा कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असून पुन्हा ते निर्णयात बदल करू शकतात.इंदापूर येथील कार्यक्रमात बोलताना बामसेफचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी १० डिसेंबरला ओबीसी जातनिहाय जनगणना तसेच शेतकरी विरोधी कृषी कायदे व इतर मुद्यावर भारत बंदचे आवाहन केले होते त्याचा मोठा दबाव सरकारवर असल्याचे या निर्णयातून दिसून येत असल्याचे ॲड.राहुल मखरे यांनी सांगितले.