भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवणी सत्र न्यायालयाने मोठा झटका जामीन अर्ज फेटाळला
पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे, संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अडचणीत आले आहेत.
भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवणी सत्र न्यायालयाने मोठा झटका जामीन अर्ज फेटाळला
पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे, संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अडचणीत आले आहेत.
क्राईम;बारामती वार्तापत्र
भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीला सुरुवात झालीय. थोड्यात वेळात याबाबत न्यायालय निर्णय देणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या बाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यात पोलीस फौजफाटा वाढवला
आमदार नितेश राणे हे अद्यापही जिल्ह्यात दाखल झाले नाहीत. त्यांचा शोध घेण्याकरिता जिल्हा पोलिसांचे ( पथक कालच गोवा आणि मुंबईत दाखल झाले आहे. आमदार नितेश राणे हे सोमवारी रात्री नारायण राणे यांना गोवा विमानतळावर भेटल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना अटक झाल्यास जिल्ह्यातील वातावरण तापू शकते, हे लक्षात घेता जिल्ह्यात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कणकवली मध्ये पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे.
- शिवसेना – राणे समर्थक आमने सामने
दरम्यान, नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय येणार असतानाच दुसरीकडे सिंधुदुर्गात राणे समर्थक व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. कणकवलीत राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे.
- देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण
राज्यात दरोडेखोरांना पकडायला वेळ नाहीये. बलात्काऱ्यांना पकडायला वेळ नाहीये. सट्टा- पत्ता, दारू, सर्व अवैध धंदे सुरू आहेत. मात्र, या सरकारला नारायण राणे यांच्या घरी जाऊन नोटीस द्यायला वेळ आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही नारायण राणे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे असल्याचे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
- परिणाम भोगावे लागतील : मुनगंटीवार
भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणात पोलीस शोधत आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले आहे. या घटनेचा समाचार घेताना, सरकारने आगीशी खेळ सुरू केला आहे व त्याचा अंजाम नक्कीच भोगावा लागेल असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सांगितलं