भाजप आमदार नितेश राणे यांची जामीनावर आज सुटका
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आज जामिनावर निकाल दिला
भाजप आमदार नितेश राणे यांची जामीनावर आज सुटका
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आज जामिनावर निकाल दिला
सिंधुदुर्ग :प्रतिनिधी
भाजप आमदार नितेश राणे यांची जामीनावर आज सुटका झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने आज जामिनावर निकाल दिला. दरम्यान, राणे यांना जामीन मिळणार का, याची उत्सुकता होती. अखेर त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ते जेलमधून बाहेर येणार आहेत. दरम्यान, नितेश राणे यांची तब्बेत बिघडली होती. त्यांच्यावर कोल्हापूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्याआधी नितेश राणे यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. रात्री तीन वाजल्यापासून उलट्या होत असल्याने नितेश राणे हैराण झाले आहेत. नितेश राणे यांच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांना जामीन मंजूर झाल्याने कार्यकर्त्यांत उत्साह दिसून येत आहे. गेले अनेक दिवस त्यांना जामीन मिळणार का, याची उत्सुकता होती. दरम्यान, साक्षीदारांवर दबाव आणता येणार नाही. तसेच पोलीस ठाण्यात हजेरी या अटीवर न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नितेश राणे यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणे यांचा हा जामीन मंजूर झाला. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनाही जामीन मिळाला आहे.