इंदापूर

भाजप कामगार आघाडी यांच्या माध्यमातून आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांना छत्री व मास्क चे वाटप

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कामगार आघाडीचा सूक्त उपक्रम

भाजप कामगार आघाडी यांच्या माध्यमातून आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांना छत्री व मास्क चे वाटप

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कामगार आघाडीचा सूक्त उपक्रम

निलेश भोंग ; प्रतिनिधी

भिगवण येथील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडीच्या वतीने भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोरोना बचावासाठी उपयुक्त मास्क व छत्री वाटप करण्यात आले. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका ऊन व पाऊस तसेच कोरोणा सारख्या महामारीच्या कठीण काळात अविरत काम करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप कामगार आघाडीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या साहित्यांचे वाटप केल्याबद्दल अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी समाधान व्यक्त केले.

भिगवण ग्रामपंचायत सभागृहांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे,भाजप भटक्या विमुक्त आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक वणवे, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, भिगवणचे सरपंच तानाजी वायसे, माजी सरपंच पराग जाधव, भाजपचे गटनेते संपत बंडगर, प्रदेश सचिव दिनेश मारणे, जिल्हा उपाध्यक्ष संजय सकुंडे, मावळ तालुकाध्यक्ष
अमोल भेगडे, आंबेगाव तालुकाध्यक्ष दिलीप यलभर, दौंड तालुकाध्यक्ष उमेश सोनवणे, सचिव शशिकांत कुटे, संदीप खुटाळे, अशोक पाचांगणे, माजी उपसरपंच जयदीप जाधव,हरिभाऊ पांढरे, जावेद शेख, बाळा भोसले, गुराप्पा पवार, तक्रारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सचिन वाघ, रोहित बगाडे, भिगवण
शहराध्यक्ष राजेंद्र जमदाडे, उपाध्यक्ष दिलीप कुंभार आदींसह भिगवण ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

कोरोनाच्या कठिण काळात आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी उल्लेखनीय काम केले आहे. फ्रंटलाईन वर्कर असलेला हा घटक मात्र दुर्लक्षित राहिला आहे. भाजप कामगार आघाडीने आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना छत्री व मास्क वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश मारणे यांनी केले,तर सुत्रसंचालन राजेंद्र जमदाडे यांनी केले. आभार संदीप खुटाळे यांनी मानले.
ज्ञानेश्वर मारकड,दिलीप कुंभार, गणेश खडके, रोहित बगाडे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!