भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीने गळफास घेऊन आत्महत्या
दिवसभर या सौंदर्यांच्याच आत्महत्येविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते
भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीने गळफास घेऊन आत्महत्या
दिवसभर या सौंदर्यांच्याच आत्महत्येविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते
बंगळुरू
भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नात सौंदर्याने केलेल्या आत्महत्येबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. माजी मुख्यमंत्र्यांची नात असणाऱ्या आणि पेशाने डॉक्टर असणाऱ्या सौंदर्याने आत्महत्या का केली यासारखे प्रश्न कर्नाटकातील नागरिकांना पडत आहेत तसेच सवाल देशातील अनेक नेत्यानाही पडले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत सौंदर्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला नव्हता. मात्र याबाबत राजकीय नेत्यांची मते जाणून आणि येडियुरप्पा यांच्या विश्वासू असणाऱ्या अनेकांकडून माध्यमातील पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र दिवसभर आत्महत्येचं मूळ कारण समोर आले नव्हते.
दिवसभर या सौंदर्यांच्याच आत्महत्येविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र सायंकाळी सात नंतर कारण समोर आले आहे. आता सौंदर्याने आत्महत्या केल्याचे समोर आले असले तरी तिने आत्महत्या करण्याअगोदर बाळाला दुसऱ्या रूममध्ये सोडून, आपल्या खोलीत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.