पुणे

भाजप नेते किरीट सोमय्या यांना संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज

शिवसेनेवर केलेले खोटे आरोप खपवून घेणार नाही असाही इशारा यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांना संचेती रुग्णालयातून डिस्चार्ज

शिवसेनेवर केलेले खोटे आरोप खपवून घेणार नाही असाही इशारा यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना दिला आहे.

पुणे : प्रतिनिधी

भाजप नेते किरीट सोमय्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी शिवसैनिकांनी राडा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना धक्काबुक्कीही केली. या गदारोळात सोमय्या पायऱ्यांवर पडले. यात दुखापत झालेल्या सोमय्या यांना संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवायचं काम लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलं.

संजय राऊत यांचा व्यावसायिक भागिदार सुजीत पाटकर याच्या बनावट कंपनीने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. त्यामुळे शिवसैनिक बिथरले आणि त्यांनी अचानक महापालिकेबाहेर राडा केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा निषेध केलाय… तर या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय. सध्या या प्रकरणामुळे राजकारण चांलचं तापलं आहे.

Related Articles

Back to top button