भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर – डॉ.प्रतीत सामधानी
त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर – डॉ.प्रतीत सामधानी
त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई :प्रतिनिधी
भारतरत्न लता मंगेशकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोना सोबकच निमोनियाची लक्षणे दिसून आली. वयोमान आणि इतर शारीरिक व्याधींमुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आणखीन काही दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवावे
कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना आणखीन काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. यावेळी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, लताजी किती दिवसांत बऱ्या होतील हे सांगणे कठीण आहे. लोकांनी लताजी यांच्यासाठी प्रार्थना करावी, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. लता मंगेशकर यांचं वय आणि त्यांची प्रकृती पाहता त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.
लता मंगेशकर यांचा अनेक पुरस्कारांनी सम्मान
गानकोकीळा लता मंगेशकर यांनी वयाची 92 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. 1974 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून स्थान दिले. त्यांनी 1948 ते 1974 या काळात 25,000 हून अधिक गाणी गायली आहेत.
लता मंगेशकर यांची 8 जानेवारी ला कोरोना चाचणी करण्यात आली होती. दहा जानेवारीला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव आला. त्यामुळे घराशेजारील बीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.