भारतातील सर्वात लांब पल्याच्या शंभू ज्योतीचे बारामतीत उत्साहात स्वागत
२३०० किलोमीटर
बारामती वार्तापत्र
उत्तराखंड केदारनाथ ते लोधवडे माण या २३०० किलोमीटर भारतातील सर्वात लांबपल्याच्या शंभु ज्योतीचे बारामती येथे क्रीडा संकुल बारामती येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख,बारामतीचे प्रांत दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव बापू सातव साहेब,ऍड.बर्गे साहेब,तालुका क्रीडा अधिकारी डिचले,दीपक घाडगे,शंभू ज्योतीचे आयोजक वैभव बाबा मोरे,माण तालुका रहिवाशी संघांचे शशिकांतनाना देशमुख,अशोक देवकर शामराव राऊत,उमेश पांढरे,शहाजी खाडे,आप्पासाहेब भांडवले,सुशील शिंदे,शिवाजी बोराटे यांच्यासह माण तालुका रहिवाशी संघांचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.