भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी तैनुर शेख
बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यातील संघांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी तैनुर शेख
बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यातील संघांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील सा.वतन की लकीरचे संपादक तैनुर शेख यांची नुकतीच भारतीय पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघाचे पश्र्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अँड.कैलास पठारे व जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका यांच्या वतीने नुकतीच सुदित हॉटेल बारामती या ठिकाणी आयोजित मासिक सभा व कार्यशाळा प्रसंगी निवड करण्यात आली. यावेळी दि पुणे लॉयर्स कंझ्युमर को.ऑप.सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक अँड.पांडुरंग ढोरे, पुणे वकील बार आसोसियशनचे उपाध्यक्ष व संघाचे कायदेशीर सल्लागार अँड.योगेश तुपे, पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे, पुरंदर तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ, दौंड तालुकाध्यक्ष सुभाष कदम, बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे इ. मान्यवर उपस्थित होते.
निवडप्रसंगी शेख म्हणाले की, येणार्या काळात भारतीय पत्रकार संघाचे जिल्ह्यात जाळे निर्माण करून संघाचा वेलू गगनभरारी घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप बनसोडे यांनी तर आभार सोमनाथ जाधव यांनी मानले. यावेळी बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यातील संघांचे पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.