इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची किसान काँग्रेस मोर्चाची मागणी
महावितरणचे उपविभागीय अभियंता रघुनाथ गोफणे यांना दिले निवेदन

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची किसान काँग्रेस मोर्चाची मागणी
महावितरणचे उपविभागीय अभियंता रघुनाथ गोफणे यांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील सुरू असलेली शेती पंपाची वीज तोडणी मोहीम बंद करून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी इंदापूर तालुका किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात शुक्रवारी (दि.२०) रघुनाथ गोफणे उपविभागीय अभियंता महावितरण इंदापूर यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत.वापरलेल्या विजेचे मूल्य सुद्धा भरले पाहिजे पण शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता वीजबिल भरणा करण्यास वेळ देऊन तालुक्यातील सर्व वीज पुरवठा त्वरित पूर्ववत करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना किसान कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.संतोष होगले म्हणाले की,इंदापूर तालुक्यामध्ये वीज तोडणी सुरू असल्याने व पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या आहेत. त्यामुळे मायबाप सरकारने शेतीपंपाची वीज पूर्ववत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्निल सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर,उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर,जिल्हा सरचिटणीस जाकिर काझी, इंदापूर तालुका किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.संतोष होगले,सरचिटणीस श्रीनिवास शेळके, शहराध्यक्ष रमजान बागवान, आकाश पवार, युवराज गायकवाड,चेतन कोरटकर आदी उपस्थित होते.