भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती बारामती शहरात उत्साहात संपन्न
कोरोनाच सावट असल्यामुळे यावर्षी बारामती शहरात अत्यंत सध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती बारामती शहरात उत्साहात संपन्न
कोरोनाच सावट असल्यामुळे यावर्षी बारामती शहरात अत्यंत सध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला
बारामती वार्तापत्र
झाली.बुधवार दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,तहसीलदार विजय पाटील,पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे,मुख्यधिकारी किरणराज यादव व नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुद्ध पूजापाठाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,माजी नगरसेवक सुधीर सोनवणे,किशोर सोनवणे,उपनगराध्यक्ष अभिजित जाधव,गटनेते सचिन सातव,नगरसेविका निता चव्हाण,अनिता जगताप,मयुरी शिंदे,ज्योती सरवदे,आरती शेंडगे,नगरसेवक बिरजू मांढरे,गणेश सोनवणे,राजेंद्र बनकर,कुंदन लालबिगे,नवनाथ बल्लाळ,माजी नगरसेवक अभिजित चव्हाण,सुरज शिंदे,दिनेश जगताप,अप्पा अहिवळे,विजय खरात,काळुराम चौधरी,सचिन साबळे,राहुल कांबळे,अरविंद बगाडे ,रमेश साबळे,ॲड.विनोद जावळे,ॲड.सुरेश कांबळे,वि.श्री कांबळे गुरुजी यांच्यासह आदी उपस्थित होते.
यंदाच्या जयंती महोत्सवावर कोरोनाच सावट असल्यामुळे यावर्षी बारामती शहरात अत्यंत सध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी उपस्थित अनुयायींना शुभेच्छा देत.कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केले.यावेळी बारामती शहरातील सिद्धार्थ नगर,सुहास नगर,चंद्रमणी नगर,अंनत नगर,प्रबुद्ध नगर याठिकाणी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करत पूजापाठ संपन्न झाले.
दरम्यान हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे ॲड.सुशिल अहिवळे,गौतम शिंदे,प्रा.रमेश मोरे,शंकर गव्हाळे,सचिन काकडे,गजानन गायकवाड,सोमनाथ रणदिवे,शुभम अहिवळे,चेतन शिंदे,चंद्रकांत भोसले,कैलास शिंदे,मनोज केंगार,सिद्धार्थ शिंदे,सुशील भोसले,सचिन जगताप,कृष्णा सोनवणे,प्रा.निळकंठ ढोणे,राहुल सोनवणे,भास्कर दामोदरे यांनी विशेष परिश्रम घेतले.