क्राईम रिपोर्ट

भावाच्या नात्याला काळीमा! जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; बाजरीच्या शेतात पुरला मृतदेह

सख्खा भाऊ पक्का वैरी

भावाच्या नात्याला काळीमा! जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; बाजरीच्या शेतात पुरला मृतदेह

सख्खा भाऊ पक्का वैरी?

बारामती वार्तापत्र 

भावाच्या नात्याला काळीमा फासणारी थरारक घटना पुण्यातील जेजुरी जवळील मावडी येथे उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाचा निर्घृण खून केल्याने जेजुरी परिसरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे जेजुरी पोलिसांनी ही केवळ २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे, या गुन्ह्यात खून करणाऱ्या छोट्या भावाचं वय 68 तर मयत भावाचं वय 82 आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ज्ञानदेव लक्ष्मण भामे (वय 82) यांचा मृतदेह बाजरीच्या शेतामध्ये आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा मृत्यू नैसर्गिक असावा असे वाटत होते. मात्र, पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या आणि चौकशीतून खळबळ जनक माहिती पुढे आली. ज्ञानदेव भामे (वय 82)आणि त्यांचे सख्खे भाऊ चांगदेव भामे (वय 68) यांच्यात शेताच्या वाटपावरून वाद सुरू होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती . यानंतर पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता. मयत ज्ञानदेव लक्ष्मण भामे हा शेतात जाण्यासाठी रस्ता देत नव्हता. वहिवाटीचा रस्ता अडवून तो त्रास देत होता. त्यामुळे त्याला लाथा बुक्क्या आणि दांडक्याने मारहाण केल्याचे चांगदेव भामे यांनी पोलिसांना सांगितले.

अहवालात देखील मयत भामे यांच्या डोक्याला मारहाण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपी चांगदेव भामे याला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली. आयुष्याच्या उत्तरार्धाला लागलेल्या या भावाने आपल्या मोठ्या भावाचा खून करून काय मिळवले? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे..!

Related Articles

Back to top button