भाविकांसाठी खूशखबर!अंबाबाई-जोतिबाच्या,शिर्डीत साई परिक्रमा दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची

राज्यभरातल्या प्रसिद्ध देवस्थानांनी ई-पासची सक्ती रद्द करत भक्तांना थेट देवाचं दर्शन घेण्याची मुभा दिली आहे.

भाविकांसाठी खूशखबर!अंबाबाई-जोतिबाच्या,शिर्डीत साई परिक्रमा दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची  

राज्यभरातल्या प्रसिद्ध देवस्थानांनी ई-पासची सक्ती रद्द करत भक्तांना थेट देवाचं दर्शन घेण्याची मुभा दिली आहे.

प्रतिनिधी

कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता हळूहळू हे निर्बंध शिथिल केले जात आहेत. शाळा देखील सुरू झाल्या आहेत. भाविकांसाठी मंदिरं खुली झाली आहेत पण त्यासाठी ई पास लागत असल्याने अजूनही सर्वांना हवं तेव्हा दर्शन घेणं शक्य होत नाही.

आता राज्यभरातल्या प्रसिद्ध देवस्थानांनी देखील ई-पासची सक्ती रद्द करत भक्तांना थेट देवाचं दर्शन घेण्याची मुभा दिली आहे. कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी आता ई पासची गरज लागणार नाही. त्यामुळं आता अंबाबाई मंदिराच्या चार दरवाजातून भक्तांना प्रवेश मिळणार आहे.

कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आता ई-पासची गरज लागणार नाही, देवस्थान समितीने ई पासची सक्ती रद्द केली आहे. चारही दरवाजांतून आजपासून मंदिरात प्रवेश घेता येणार आहे. भाविकांच्या मागणीचा आदर करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीक़डून निर्णय घेण्यात आला आहे. तिकडे जोतिबाच्या दर्शनासाठी आता ईपासची गरज लागणार नाही. त्यामुळे आता सर्व भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

निर्णयामुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच, मंदिराचे सर्व दरवाजे खुले करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई पासची सक्ती रद्द झाल्यानंतर भक्तांनी देखील समाधान व्यक्त केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram