इंदापूर

भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी तानाजी वायसे व उपसरपंच पदी शितल शिंदे यांची निवड

भिगवणच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध राहणार असल्याचे मत केले व्यक्त

भिगवण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी तानाजी वायसे व उपसरपंच पदी शितल शिंदे यांची निवड

भिगवणच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध राहणार असल्याचे मत केले व्यक्त

इंदापूर : सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )

भिगवण ग्रामपंचायतीच्या आज (दि.०९) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय जाणकारांचे अंदाज चुकवत हर्षवर्धन पाटील समर्थक तानाजी अनिल वायसे व उपसरपंचपदी शितल बाबासाहेब शिंदे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी महानवर यांनी जाहीर केले.

भिगवण ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीने लढवली गेली. यामध्ये हर्षवर्धन पाटील समर्थक स्व. रमेश (बापू) जाधव प्रेरीत श्रीनाथ ग्रामविकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनलला धूळ चारत सतरा पैकी सोळा जागांवर विजय मिळवत, भिगवण ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व स्थापन केले. (दि ०९) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील तानाजी वायसे व शितल शिंदे यांच्या निवडीमुळे भिगवणकरांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी पॅनल प्रमुख पराग जाधव, उपसभापती संजय देहाडे, गटनेते संपत बंडगर, तुकाराम भरणे, अशोक शिंदे, मानसिंग जाधव, अशोक रायसोनी, अजित क्षीरसागर, अभिमन्यू खटके, गुलामभाई शेख, जावेद शेख, खंडेराव गाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी महानवर, सहाय्यक निवडणूक अधिकारी डि.ए गाडेकर व ग्रामविस्तार अधिकारी डि.बी. परदेशी यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram