भिगवण

भिगवण पोलीस कडुन जेरबंद १०,६४०00/- रूपयेचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त

भिगवण व वालचंदनगर हद्दीत दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा

भिगवण पोलीस कडुन जेरबंद १०,६४०00/- रूपयेचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त

भिगवण व वालचंदनगर हद्दीत दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा

भिगवण :- बारामती वार्तापत्र रिपोर्ट

मा. पोलीस अधीक्षक सो. पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामी जिल्हयात घरफोडी चोरी या सारखे गंभीर
गुन्हे घडण्याचे सत्र चालु असलेने वरील गुन्हयांना आळा घालणे कामी तसेच गुन्हेगार टोळ्यांच्या मुसक्या
आवळुन वेळीच प्रतिबंध करण्याबाबत प्रभारी अधिकारी भिगवण पोलीस स्टेशन पुणे ग्रामी यांना आदेश दिले
होते.

मा. पोलीस आधीक्षक सो, पुणे ग्रा. मा. अपर पोलीस अधीक्षक सो, पुणे विभाग , मा. उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांनी दिलेल्या सुचनाचे पालन करून मा.श्री. जीवन माने सो सहा. पोलीस निरीक्षक , मा. श्री. एस. बी. रुपनवर, पोलीस उप निरीक्षक सो, एस.डी.कारंडे /पो.हवा. ४३१ एन. एस. भागवत / पो. ना. १९५४ , सर्व भिगवण पोलीस स्टेशन यांनी चोरीचे गुन्हयाचा तपास करीत असता अजा दि. २८/०१/२०२१ रोजी गुन्हयाचा तपास करीत असताना म्हसोबावाडीत राहुल उर्फ अमोल मोतीराम पवार रा. म्हसोबावाडी ता. इंदापुर जि. पुणे याने मंडपाचे कामे घेत असुन आरोपीने सदर चोरी केली असल्याचे संशय असल्याने सदर इसमाची म्हसोबावाडी अंगझड घेतली असता त्याच्या कडे सोन्याचा राणी हार मिळुन आला असता त्यास सदर राणी हार बाबत वचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास भिगवण पोलीस स्टेशनला आणुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा
दिनांक २३/०१/२०२१ रोजी दुपारी १:०० वा ते १:३० वा चे सुमारस केल्याचे कबुल केले असुन दिनांक १७/१२/२०२० रोजी रूई ता. इंदापुर जि. पुणे येथे एक गुन्हा केल्याचे कबुल केले सदर गुन्हयातील माल माझे गाडीत आहे असे सांगुन सदर दोनही गुन्हयातील सोने काढुन दिले.

सदर गुन्हया बाबत वालचंद नगर पोलीस स्टेशनला ५१८/२०२० भादवि कलम ४५४,३८० व भिगवण पोलीस स्टेशनला गु. रजि.नं २६/२०२१ भादवि कलम ४५४,३८० प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर तपास पोलीस उप निरीक्षक एस. बी. रूपनवर सो भिगवण पोलीस स्टेशन करीत आहेत.

Back to top button