भिगवण पोलीस ठाणे इमारतीचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भूमिपूजन
१ हजार १०७ कोटी रुपयांचा निधी
भिगवण पोलीस ठाणे इमारतीचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते भूमिपूजन
१ हजार १०७ कोटी रुपयांचा निधी
बारामती वार्तापत्र
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन आज झाले. विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, तक्रारवाडीचे सरपंच सतीश वाघ आदी उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी आणण्यास प्रयत्नशील असून कोरोना महामारीमुळे आर्थिक संकट असतानाही निधी मिळण्यात अडचण येऊ दिली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्यातून भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटात सुमारे १ हजार १०७ कोटी रुपयांचा निधी आणला असून पुढील काळातदेखील निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे श्री.भरणे यांनी सांगितले.
प्रास्ताविक अप्पर पोलिस अधीक्षक श्री. मोहिते यांनी केले .