इंदापूर पोलिसांकडून चोरीचे डिझेल घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
त्याने डाळज नं. २ येथे एका हॉटेलसमोर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रक लावून पळ काढला.

इंदापूर पोलिसांकडून चोरीचे डिझेल घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
त्याने डाळज नं. २ येथे एका हॉटेलसमोर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रक लावून पळ काढला.
बारामती वार्तापत्र
चोरीचे डिझेल घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सोमवारी रात्री कारवाई करीत इंदापूर पोलिसांनी १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. इंदापूर पोलिसांनी डिझेलने भरलेल्या कॅनसह ट्रक (क्र. एमपी – ०९ एचजी ८०६) ताब्यात घेतला असून अज्ञात ट्रक चालक व त्याच्या साथीदारावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तरंगवाडी (ता. इंदापूर) हद्दीतील जे. के. जगताप अँन्ड कन्स्ट्रक्शन यांचे क्रशर प्लॅन्टवरील महेंद्र रामचंद्र खाडे यांच्या पोकलेनमधील २०० लिटर डिझेल चोरी झाल्याची फिर्याद दि. २४ सप्टेंबर रोजी इंदापूर पोलिसांत दाखल झाली होती. सदर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी इंदापूरचे पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, सहायक फौजदार सतीश ढवळे, मोहम्मदअली मड्डी आदींचे पथक तयार करून तपास सुरू केला होता.
दरम्यान, पुणेच्या दिशेने निघालेल्या ट्रकमध्ये चोरीच्या डिझेलचे कॅन ठेवल्याची माहिती रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलिसांनी हालचाली केल्या. ट्रक चालकाने ट्रक भरधाव वेगाने चालवून पोलिसांच्या वाहनाला कट मारला.
त्याने डाळज नं. २ येथे एका हॉटेलसमोर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रक लावून पळ काढला.
पोलिसांनी घटनास्थळावर जात ट्रकची पाहणी केली असता, त्यात चोरीचे डिझेलने भरलेले कॅन व डिझेल
चोरीसाठी वापरण्यात येणारा पाईप मिळून आला.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश माने करीत आहेत.