भिगवण येथील मारुतराव वनवे यांची भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रीत सदस्य पदी निवड
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र व सत्कार

भिगवण येथील मारुतराव वनवे यांची भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रीत सदस्य पदी निवड
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र व सत्कार
निलेश भोंग ; प्रतिनिधी
भिगवण येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुतराव वणवे यांची पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली असून
नियुक्तीचे पत्र माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि.१०) एका कार्यक्रमात वणवे यांच्याकडे सुपूर्द करुन पाटील यांनी सन्मान केला तसेच नियुक्तीबद्दल अभिनंदनही केले.
यावेळी संदीप खुटाळे,बाळासाहेब भांडवलकर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मारुतराव वणवे यांचे इंदापूर तालुका व पुणे जिल्ह्यात भाजपच्या वाढीसाठीचे योगदान व सक्रियता पाहून पक्षाने त्यांना कार्यकारिणीवर काम करण्याची संधी दिली आहे. वणवे यांची नियुक्ती होण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
भाजप पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे मनापासून आभार. मला पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या संधीचे सोने करुन पक्षवाढीसाठी अथक परिश्रम घेणार असल्याचे मारुतराव वनवे यांनी यावेळी सांगितले.