इंदापूर

भिमाई आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे परिपोषण आहाराचे अनुदान मिळाले नसल्याने इंदापूर तहसील कचेरीवर मोर्चा.

15 ऑगस्ट पर्यंत अनुदान न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.

भिमाई आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे परिपोषण आहाराचे अनुदान मिळाले नसल्याने इंदापूर तहसील कचेरीवर मोर्चा.

15 ऑगस्ट पर्यंत अनुदान न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा.

इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

सामाजिक न्याय विभागाच्या भटके विमुक्त जाती जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्ग खात्यामार्फत येत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने सन्मानित इंदापूर येथील प्राथमिक भिमाई आश्रम शाळा (निवासी) , क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले माध्यमिक आश्रम शाळा (निवासी) , राजमाता अहिल्यादेवी होळकर (निवासी) कनिष्ठ महाविद्यालय यांचे विद्यार्थ्यांचे गतवर्षीचे परी पोषण आहाराचे अनुदान मार्च 2020 रोजी मिळणे आवश्यक होते. हे अद्याप पर्यंत मिळाले नाही.

याबाबत सर्व संबंधितांना लेखी निवेदने देऊन विनंती करून अद्याप अनुदान मिळाले नाही.गतवर्षी मागील सरकारने आश्रमशाळांना रेशन वरती रेशनिंगच्या भावात मिळणारा गहू तांदूळ आठ महिने बंद केला होता,त्यामुळे गतवर्षी आश्रम शाळेला दरमहा दिड लाख रुपयाच्या आसपास ज्यादा खर्च करावा लागला, म्हणजेच गतवर्षी बारा ते पंधरा लाख रुपये ज्यादा खर्च विद्यार्थ्यांच्या भोजना वरती करावा लागला.अगोदरच डबघाईला आलेल्या आश्रम शाळा बंद पाडण्याचा हेतू मागील सरकारचा होता.व गोरगरीब बहुजनांची भटक्या-विमुक्तांची मुले-मुली शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कुटिल डाव होता.या भयानक अवस्थेतून आश्रमशाळांना संस्थाचालकांना जावे लागले अशी माहिती ट्रस्ट चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी दिली असून मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित भिमाई आश्रमशाळेच्या वतीने सन 2019 – 20 चे 40 टक्के विद्यार्थ्यांचे परिपोषण आहाराचे अनुदान मिळावे याप्रमुख मागणीसाठी दि. 7 ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या नेतृत्वाखाली आश्रमशाळा, नेहरूचौक ,मुख्य बाजारपेठ ते तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मखरे यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याशी चर्चा करून नायब तहसीलदार श्रीमती शुभांगी आधटराव यांना मागण्यांचे निवेदन दिले.

यावेळी आश्रमशाळेच्या विश्वस्त शकुंतला मखरे, समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार उपस्थित होते. यासंदर्भात मखरे म्हणाले, विद्यार्थ्यांचे परिपोषण आहार अनुदान मार्च 2020 पर्यंत मिळणे अपेक्षित असताना ते अध्याप मिळाले नाही. ते तातडीने देणे गरजेचे आहे.कनिष्ठ महाविद्यालयात गेले चार ते पाच वर्षांपासून अपुरे कर्मचारी व प्राध्यापक आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक गानबोटे व गायकवाड यांच्या नेमणुकी संदर्भातील फाईल पाच वर्षांपासून पुणे संचालक कार्यालयात धूळ खात पडल्या आहेत. शिपाई, स्वयंपाकी, रिक्त पदावरील शिक्षक व अपुरे कर्मचारी दिले जात नाहीत. महिला अधीक्षक अनिसा मुल्ला यांना तीन वर्षांपासून पगार नाही. त्यामुळे दि. 15 ऑगस्ट पर्यंत या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावी आपण एकटे लाक्षणिक उपोषण करणार आहे तसेच दि. 19 ऑगस्ट रोजी बारामती प्रांत कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram