स्थानिक

बारामती शहरामध्ये बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एकूण 150 पुडे प्रत्येकी 30 रुपये किमतीचा 50674 रु येणे प्रमाणे .

बारामती शहरामध्ये बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एकूण 150 पुडे प्रत्येकी 30 रुपये किमतीचा 50674 रु येणे प्रमाणे .

बारामती वार्तापत्र

बारामती शहरांमध्ये शासनाने बंदी घातलेल्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकत कारवाई केली असून महाराष्ट्रात गुटखा बंदी आदेश असताना देखील पानमसाला, गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने केशव जाधव व संजय जाधव रा. नेवसे रोड, कैकाडी गल्ली बारामती यांच्यावर पोलीस नाईक दशरथ कोळेकर यांच्या फिर्यादीवरून अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे अभिजीत कांबळे पोलीस नाईक दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर तसेच पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण सचिन कोकणे दशरथ इंगोले मनोज पवार यांनी ही कार्यवाही पार पाडली

आज रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं 640/2021 भादवि कलम 328 , 272 , 273 , 188 , 34 अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 चे कलम 26 ( 2 ) , ( iv ) , 27,30 ( 2 ) ( i ) 31 ( 1 )( 2 ) .59 ( i ) प्रमाणे दाखल असून त्याची माहिती खालीलप्रमाणे .

▶️ फिर्यादीचे नाव व पत्ता- दशरथ नामदेव कोळेकर वय 38 वर्षे पोलीस नाईक बं.नं. 2206 नेमणूक बारामती शहर पोलीस स्टेशन
▶️ आरोपीचे नाव व पत्ता- 1 ) केशव सोनबा जाधव वय 55 वर्षे 2 ) संजय केशव जाधव दोन्ही रा . नेवसे रोड कैकाड गल्ली बारामती ता बारामती जि पुणे
▶️ गु.घ.ता. वेळ व ठिकाण- ता . 18/11/2021 रोजी 21/00 वाजताचे सुमारास मौजे बारामती शहराचे हद्दीत नेवसे रोड येथील कैकाड गल्ली येथे
▶️ गु.दा.ता.वेळ – ता . 19/11/2021 रोजी 01/58 वाजता स्टे.डा.क्रं 05/2021
▶️ मिळाला माल
1 ) 5616 = 00 रुपये किंमतीचा विमल पान मसाला नावाचे एकूण 104 पुडे प्रत्येकी 54 रुपये किमतीचा
2 ) 2640 = 00 रुपये किंमतीचा चौकीदार पान मसाला नावाचे एकूण 24 पुडे प्रत्येकी 110 रुपये किमतीचा
3 ) 5160 = 00 रुपये किंमतीचा विमल पान मसाला नावाचे एकूण 43 पुडे प्रत्येकी 120 रुपये किमतीचा
4 ) 5236 = 00 रुपये किंमतीचा विमल पान मसला नावाचे एकूण 28 पुडे प्रत्येकी 187 रुपये किमतीचा
5 ) 2090 = 00 रुपये किंमतीचा शिमला गुटखा नावाचे एकूण 19 पुडे प्रत्येकी 110 रुपये किमतीचा
6 ) 11682 = 00 रुपये किंमतीचा विमल पान मसाला नावाचे एकूण 59 पुडे प्रत्येकी 198 रुपये किमतीचा
7 ) 1254 = 00 रुपये किंमतीचा विमल ( v 1 ) तंबाखू नावाचे एकूण 57 पुडे प्रत्येकी 22 रुपये किमतीचा
8 ) 2772 = 00 रुपये किंमतीचा विमल ( V1 ) तंबाखू नावाचे एकूण 84 पुडे प्रत्येकी 33 रुपये किमतीचा
9 ) 9724 = 00 रुपये किंमतीचा विमल पान मसाला नावाचे एकूण 52 पुडे प्रत्येकी 187 रुपये किमतीचा
10 ) 4500 = 00 रुपये किंमतीचा विमल ( v1 ) तंबाखू नावाचे एकूण 150 पुडे प्रत्येकी 30 रुपये किमतीचा
50674 रु येणे प्रमाणे .

▶️हकिकत- वर नमुद केले ता.वेळी व ठिकाणी यातील आरोपी नं 1 व 2 यांनी संगणमत करुन महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदीचा आदेश असताना देखील पान मसाला गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने आपले घराचे पाठीमागे असलेल्या स्वताचे मालकीच्या पत्र्याचे शेडमध्ये बेकायदा 50674 / – रुपये किंमतीचा व वरील वर्णनाचा पान मसाला गुटख्याचा साठा करुन ठेवला असताना आरोपी नं 1 केशव सोनबा जाधव हा मिळून आला व आरोपी नं 2 संजय केशव जाधव हा पोलीसांची चाहूल लागताच पळून गेला आहे वगैरे मजकुराचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टरी दाखल पुढील तपास पोसई पाटील सो हे करीत आहेत .

▶️दाखल अंमलदार-पो.हवा . काळे 711 मो.नं 8329868614
▶️तपासी अंमलदार- पोसई पाटील सो मो.नं 9665570011
▶️ प्रभारी अधिकारी मा . सुनिल महाडिक सो पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन मो.नं 9823562255

Related Articles

Back to top button