इंदापूर

भिमाई आश्रमशाळेत रिमझिम पावसात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

विश्वस्त अस्मिता मखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

भिमाई आश्रमशाळेत रिमझिम पावसात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

विश्वस्त अस्मिता मखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

इंदापूर :- प्रतिनिधी
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर अंकित प्राथमिक आश्रमशाळा ,माध्यमिक आश्रमशाळा,ज्युनिअर कॉलेज, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१५ ऑगस्ट रोजी भिमाई आश्रम शाळेत ७४ वा स्वातंत्र्य दिन स.८:२० वा.साजरा करण्यात आला. कोविड १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर, व सामाजिक / शारिरीक अंतर पाळण्यात आले. तसेच शासनाने घालुन दिलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करून संस्थेच्या संचालक अस्मिता मखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे,माजी नगरसेविका तथा जेष्ठ संचालक शकुंतला मखरे ,सचिव ॲड.समीर मखरे,प्राचार्या अनिता साळवे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, तसेच संस्थेचे कर्मचारी हजर होते.सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.

Related Articles

Back to top button