मुंबई

भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चौकशी आयोगासमोर नोंदवणार साक्ष

घटनेनंतर जवळपास 165 लोकांवर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले.

भीमा कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चौकशी आयोगासमोर नोंदवणार साक्ष

घटनेनंतर जवळपास 165 लोकांवर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले.

मुंबई – प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज भीमा कोरेगाव प्रकरणी आपला साक्ष नोंदवणार आहेत. भीमा कोरेगाव  इथं घडलेल्या हिंसचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पवार साक्ष देणार आहेत.

आयोगाकडून 5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीत हजर राहण्यासाठी पवारांना देण्यात आलेलं हे तिसरे समन्स आहे. सकाळी साडेदहा वाजता शरद पवार आयोगासमेर साक्ष देणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी शरद पवारांनी आपलं अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही नुकतंच आयोगापुढे सादर केलं होतं.

तसेच, यापूर्वी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते. पण काही कारणास्तव ते हजर राहू शकले नाहीत. दरम्यान, आज भीमा कोरेगाव प्रकरणी ते आपली साक्ष नोंदवणार आहेत.

पुण्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात दोन समाजातील गटांमध्ये हाणामारी झाली असून या घटनेत एकाचा मृत्यू तर काही जण जखमी झाले होते. या घटनेनंतर जवळपास 165 लोकांवर पुणे पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावेळी असलेल्या तात्कालिक देवेंद्र फडणीस सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत शरद पवार यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एल्गार परिषदेकडून चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे हिंसाचार झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात 18 सप्टेंबर 2018 ला शरद पवार यांच्याकडून पहिले प्रतिज्ञापत्र सादर झाला असून 11 एप्रिल 2022 ला दुसरा प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button