भीमा कोरेगाव येथील अभिवादन कार्यक्रम यंदा गर्दी न करता करण्याचे शासनाचे आवाहन
दूरदर्शन व इतर माध्यमातून होणार थेट प्रक्षेपण

भीमा कोरेगाव येथील अभिवादन कार्यक्रम यंदा गर्दी न करता करण्याचे शासनाचे आवाहन
दूरदर्शन व इतर माध्यमातून होणार थेट प्रक्षेपण
बारामती वार्तापत्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा भीमा -कोरेगाव येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम कोणतीही गर्दी न करता फक्त प्रतीकात्मक स्वरूपातच साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
भीमा-कोरेगाव जयस्तंभ अभिवादन गर्दी न करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख.
1 जानेवारी 1818 रोजी भीमा-कोरेगाव युद्धात कामी आलेल्या व जखमी झालेल्या योद्धय़ांच्या स्मरणार्थ पुणे जिह्यातील हवेली तालुक्यातील पेरणे येथे जयस्तंभ उभारण्यात आला आहे. 1 जानेवारी रोजी राज्यभरातून आंबेडकरी जनता येथे वंदनासाठी येत असते. मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे सर्वच सण, उत्सवावेळी गर्दी करण्यास निर्बंध होते. त्याचे पालन राज्यातील सर्वधर्मीय जनतेने कसोशीने केले आहे. अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नसल्याने गर्दी करण्यावरील निर्बंध कायम आहेत. त्यामुळे यंदाच्या अभिवादन कार्यक्रमासदेखील गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन तसेच इतर माध्यमांद्वारे करण्यात येईल.