भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
उजनी धरण सांडव्यातून भीमा नदी पात्रात ५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
उजनी धरण सांडव्यातून भीमा नदी पात्रात ५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग
इंदापूर : प्रतिनिधी
उजनी धरणात शनिवारी ( दि.९ ) सायंकाळी ८ वाजता उपयुक्त पाणीसाठा १०८.३१ टक्के इतका झाला आहे.त्यामुळे पुर नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून सायंकाळी ९ वाजता उजनी धरण सांडव्यातून भीमा नदी पात्रात ५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असून भीमा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून दौंड येथील विसर्गामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे.त्याअनुषंगाने उपयुक्त पाणी साठ्यामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने अशा परिस्थितीमध्ये पूर नियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरण सांडव्यातून भीमा नदी पात्रात शनिवारी सायंकाळी ९ वाजता ५ हजार क्यूसेक इतका विसर्ग सोडण्यात येणार असून सदरचा विसर्ग आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त केला जाणार असल्याने धरणाखालील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आला आहे.